Breaking
महाराष्ट्र

आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम शनिवारी पुणतांब्यात

0 0 1 8 7 1

 

-कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम शनिवार (दि.१६) रोजी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांब्यात येणार आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई (अ) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक तथा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी आ.आशुतोष काळे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आहे राहाता तालुक्यातील पुणतांबा भागातील ११ गावांचे देखील  विकासाचे प्रश्न मार्गी लावून या अकरा गावांना न्याय दिला आहे.

हि प्रचार रॅली पुणतांबा गावातील जुने रेल्वे गेट पासून दुपारी ०३ वाजता निघणार आहे. या रॅलीसाठी मतदार संघातील तसेच पुणतांबा गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई (अ) मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या रॅलीसाठी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शुभलाभ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 7 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे