Breaking
ब्रेकिंग

मराठी चित्रपट लेखक-दिग्दर्शक सुदर्शन खडांगळे यांना ‘कार्यगौरव पुरस्कार 2025’ जाहीर

३१ मार्च रोजी शिर्डीत भव्य सोहळा

0 0 1 8 7 2

शिर्डी | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर आणि समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘कार्यगौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाभिक समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा ‘कार्यगौरव पुरस्कार’ मराठी चित्रपट लेखक-दिग्दर्शक सुदर्शन खडांगळे यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि दैनिक लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.


सुदर्शन खडांगळे : कला चित्रपटसृष्टी क्षेत्रातील एक आगळीवेगळी ओळख लहानपणापासूनच कला क्षेत्राची आवड असलेल्या सुदर्शन खडांगळे यांनी अनेक नाट्य आणि एकांकिकांमधून आपली कला सादर केली आहे. आपल्या वडिलोपार्जित सलुन व्यवसायाच्या वर्तुळातून बाहेर पडून, त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली कोपरगाव येथील रहिवासी असलेल्या सुदर्शन खडांगळे यांनी मास कम्युनिकेशन आणि व्हिडिओ प्रोडक्शन या क्षेत्रात पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली २०१४ मध्ये त्यांनी अहमदनगर न्यू आर्ट्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले त्यांनी हिंदी चित्रपट “मेरिट ऍनिमल” मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही कार्य केले आहे, ज्यामुळे त्यांचा अनुभव फक्त मराठी नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही विस्तारला आहे त्यांचा “पल्याड” हा चित्रपट अमेरिकेच्या फोर्ब्स मासिकापर्यंत पोहोचणारा पहिला मराठी चित्रपट ठरला या चित्रपटाची नोंद फोर्ब्सने आपल्या अंकात घेतली असून, यापूर्वी कोणत्याही भारतीय चित्रपटाने, वेब सिरीजने किंवा मराठी सिनेमाने अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारलेली नव्हती “पल्याड” चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, तो विविध देशांमध्ये प्रदर्शित देखील करण्यात आला आहे यानंतर सुदर्शन खडांगळे यांनी “माझा ज्ञानोबा” ही टेलिव्हिजन मालिका साकारली, जी प्रेक्षकांच्या मनावर गारूड करू शकली. ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनप्रवास तंतोतंत आणि प्रभावीपणे मांडण्याचे कठीण कार्य त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले सध्या देखील त्यांचे अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहेत तसेच पुरस्काराची घोषणा होत असतानाच, सुदर्शन खडांगळे यांनी त्यांच्या आगामी २०२५ च्या चित्रपट प्रोजेक्टबाबत महत्त्वाची माहिती उघड केली आहे आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या नव्या चित्रपटात नवोदित आणि होतकरू कलाकारांना मोठी संधी दिली जाणार आहे.
“नव्या कलाकारांना व्यासपीठ देणे गरजेचे” – सुदर्शन खडांगळे यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगितले, “मराठीत अनेक प्रतिभावान कलाकार आहेत, पण त्यांना योग्य संधी मिळत नाही. माझ्या नव्या चित्रपटात मी अशा नवीन चेहऱ्यांना, त्यांच्या कौशल्याला संधी देणार आहे. मराठी सिनेमाच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असेल.” या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून, नवोदित कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवा कलाकारांनी या प्रोजेक्टकडे नक्कीच लक्ष ठेवायला हवे!
कार्यक्रमाचा तपशील – दिनांक: सोमवार, ३१ मार्च २०२५,वेळ: सकाळी १०:०० वाजता,स्थळ: साई संत सेना महाराज मंदिर,कनकुरी रोड, शिर्डी. या कार्यक्रमात नाभिक समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग, कला आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे कार्यक्रमास उपस्थित मान्यवर भाजप युवा नेते व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे दैनिक लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे प्रदेशाध्यक्ष नाभिकरत्न सयाजीराव झुंजार दत्ताशेठ अनारसे,रामदास पवार,घनश्याम वाघ,विकास मदने,संजय गायकवाड,शांताराम राऊत,नारायण यादव,आप्पा सूर्यवंशी,अरुण सैदाणे,नंदकुमार मोरे यापूर्वी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, सुनील गायकवाड, शशिकांत सोनवणे, काकासाहेब वाघमारे, अनिल कदम, संजय जायबाहार, वैभव बिडवे आणि माधव जाधव यांनी सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले सर्व नाभिक बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शुभलाभ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 7 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे