Breaking
ब्रेकिंग

के. सुदर्शन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोपरगावचे युवा आमदार आशुतोष दादा यांच्याकडून नागरी सन्मान..!!

0 0 1 8 7 1

कोपरगाव प्रतिनिधी :

प्रसिद्ध मराठी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक के. सुदर्शन यांना कोपरगाव तालुक्याचे युवा आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते नुकताच नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात अनेक मान्यवर, पत्रकार, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सुदर्शन म्हणाले, “एखाद्या कलाकाराचा नागरी सन्मान होणे ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट असते. मला या गौरवासाठी पात्र ठरवले गेले, यामुळे माझ्या स्वतःविषयीचा आदर आणि जबाबदारी दोन्ही वाढली आहेत. हा केवळ माझा सन्मान नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रेक्षकांचा, सहकाऱ्यांचा आणि मार्गदर्शकांचा आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल.”

कार्यक्रमात आमदार आशुतोष दादा काळे म्हणाले की, “आपल्या तालुक्यातून कला क्षेत्रात सुदर्शन यांनी अतिशय प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्या गावाचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांचा नागरी सन्मान होणे आवश्यकच होते. सुदर्शन यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवावं आणि आपल्या गावाची ओळख वाढवत राहावी, ही मनापासून इच्छा आहे.”

कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये पत्रकार संजय लाड, सचिन शिंदे, बाळासाहेब खडांगळे, नितीन शिंदे, राहुल सावजी, राकेश सावजी, अरुण जोशी, महेंद्र उगले, महेश सिनारे यांचा समावेश होता. आमदार आशुतोष दादा काळे यांचा मित्रपरिवारही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला.

3/5 - (1 vote)

शुभलाभ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 7 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे