कोपरगावकरांना अभिरुचीसंपन्न दिवाळी अंकाची मेजवानी- मुख्याधिकारी सुहास जगताप

कोपरगावकरांना अभिरुचीसंपन्न दिवाळी अंकाची मेजवानी- मुख्याधिकारी सुहास जगताप
कोपरगाव- दिवाळीचा आनंद फराळ फटाक्यांसोबत दिवाळी अंक वाचनामुळे द्विगुणित होतो. लाडू, चकली, चिवडा यांचा आस्वाद घेत दिवाळी अंकाच्या वाचनातून ‘अक्षर’ फराळाची मेजवानी मिळते. कोपरगावकरांना यंदाच्या वर्षीही दिवाळी अंक वाचनाची पर्वणी साधता येणार आहे. कोपरगवाकरांनी दिवाळी अंक वाचनाचा आनंद लुटावा. असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.
दिवाळी अंकासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता कोपरगाव नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच. कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, विनोद, साहित्य, कथा, कांदबरी, कविता, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आहार, व्यंगचित्र अशा वेगवेगळ्या विषयांवरील दिवाळी अंक वाचणे म्हणजे पर्वणी असते.
मौज, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, हंस, जत्रा, आवाज, मोहिनी, धनंजय, माहेर, मेनका यांच्यासह मराठीतील नामांकित विविध प्रकाशन संस्थांचे दिवाळी अंक वाचनालयात उपलब्ध आहेत.
—